डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशनचे शिक्षक पुरस्कार जाहीर ;

कुंभोज प्रतिनिधी – विनोद शिंगे

डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशनच्या, हातकणंगले यांच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून 5 सप्टेंबर डॉ. राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी आदर्श शिक्षक 30 आदर्श शाळा तीन व आदर्श हायस्कूल दोन असे एकूण 35 पुरस्कारांचे वितरण करून त्यांचा गौरव गौरव केला जाणार आहे अशी माहिती फौंडेशनचे नूतन अध्यक्ष सार्थ मिणचेकर यांनी दिली.

 

 

पुरस्कार प्राप्त झालेले शिक्षक असेप्राथमिक विभाग – मिनाज मोमीन, रेखा चौगुले, रेखाताई कदम, मंदाकिनी मगदूम, लता नेरलेकर, योसेफ घाटगे, संजय कांबळे अशोक जाधव, राजाराम कोठावळे, इंद्रजीत कदम, विजय कांबळे, सिताराम मोरे, सुखदेव पाटील, पुनम बिरंजे, वंदना सनदी व भगवान निगवेकर.
माध्यमिक विभाग – विकास पाटील, विजयश्री कागवाडे, दीपमाला खोत, सरिता कांबळे, पंडित कांबळे, संदीप लवटे, विश्वास पाटील, महेश कुलकर्णी, तानाजी बामणीकर, शुभांगी माळी, प्रतिभा मोहिते अनिल हिंगलजे, राजेश्वरी आंबेकर, महिराज जमादार, नेहा पाटील तसेच आदर्श शाळा- विद्यामंदिर मौ.वडगाव, कन्या विद्यामंदिर, रेंदाळ, केंद्रीय प्राथमिक शाळा सावडे तर माध्यमिक आदर्श- हायस्कूल सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल पेठ वडगाव व राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली यांना पुरस्कार जाहीर झाले असून लवकरच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल अशी माहिती फौंडेशनचे सचिव राकेश खाडे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक तानाजी पवार सर यांनी केले यावेळी उपाध्यक्ष विशाल साजणीकर उपस्थित होते.

🤙 9921334545