ड्रॅगन फ्रुट च्या लागवडीतून अभियंता शेतकऱ्यांने मिळवले 16 लाखाचे उत्पन्न

सोलापूर : जवळगाव (ता बार्शी) अभियंता प्रताप ढेंगळे यांने ड्रॅगन फ्रुट लागवडीच्या प्रयोगातून वर्षाला 16 लाखापर्यंतचे उत्पन्न मिळवल आहे. प्रताप यांनी इंजीनियरिंग पास झाल्यावर पुण्यात खाजगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर व्यवसायाची आवड असल्याने मुंबईला अनेक प्रशिक्षण घेतली. कोरोनामुळे पुण्यामध्ये जम बसवता नआल्यामुळे त्याने आपल्या गावात ड्रॅगन फ्रुट सारख्या वेगळ्या फळ पिकाची सखोल ज्ञान घेऊन ऑगस्ट 2021 मध्ये सव्वा एकरात सीएम रेड जातीच्या ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. 11 टन माल काढून पहिल्याच वर्षी तेरा लाखांचे उत्पादन घेतले आहे. दुसऱ्या वर्षी 22 टन काढून 16 लाखाचे उत्पन्न झाले. तर चालू वर्षीही तेवढेच उत्पन्न मिळवले आहे.

 

ड्रॅगन फ्रुट हे कमी पाण्यावर व कमी खर्चावर येणार फळ आहे. सीएम रेड व जम्बो या दोन जातीच्या वाढीस आपल्याकडील हवामान पोषक आहे. त्यातील सीएम रेड या जातीचे फळ उन्हाळ्यात देखील 55 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात टिकाऊ धरतं.

अनेक रोगांसाठी प्रतिकारक घटक यामध्ये असल्यामुळे भारतासह बाहेर ही याला खूप मागणी आहे. स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असल्याने जास्त खर्च देखील येत नाही. या प्रकारच्या शेतीमध्ये एकदाच गुंतवणूक असून सुमारे 30 वर्षापर्यंत उत्पादन घेता येतं.

ग्रामीण भागात वेगळ्या प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळवीत प्रतापने शेतकऱ्यांसमोर चांगले उदाहरण निर्माण केले आहे.