एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप ;

मुंबई : एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्याकडून संप पुकारल्यामुळे चाकरमानांचेही हाल होत आहेत.

 

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की ,एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलावली आहे त्यात सकारात्मक चर्चा होईल. गणेश उत्सव जवळ आला आहे अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठामध्ये जाण्यासाठी एसटी चा वापर करतात. त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की, संप करू नका याबद्दल सकारात्मक चर्चा करू आणि चर्चेतून प्रश्न सुटेल. त्यामुळे एसटी कामगारांच्या संपावर आज तोडगा निघणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

🤙 9921334545