मुंबई: गुजरात मध्ये भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये हेलिकॉप्टर मधील चार क्रू सदस्या पैकी तीन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या गुजरातमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे बचाव कार्य सुरू आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गुजरात मध्ये मदत कार्यात गुंतलं होतं. पण काल रात्री पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राजवळ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे पायलेटला हेलिकॉप्टर तातडीने पाण्यात उतरावे लागले. लँडिंग च्या वेळी जोरात ते पाण्यात पडल्यामुळे हेलिकॉप्टर मधील चार जण बुडाले. त्यामधील एक जण सुखरूप आहेत तर तीन जण बेपत्ता आहेत. वैमानिकाने आपत्कालीन संदेश पाठवल्यानंतर मदतीसाठी नौदलाची चार जहाजे आणि दोन विमाने तैनात करण्यात आले आहेत या अपघाताची माहिती नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, अपघाताची चौकशीचे आदेश दिले आहेत.