भरधाव कार ने तिघांना उडवले

गोंदिया : पॉलिटेक्निक कॉलेज समोर रस्त्याच्या कडेला बसलेल्या ट्रक ड्रायव्हर व एका सायकल स्वारला भरधाव वेगात येणाऱ्या कारने उडवले. या घटनेत ड्रायव्हर व सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजता घडली.

 

 

ग्राम फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेज समोर काल रस्त्यावर खाली बसून तीन ट्रक चालक गप्पा मारत होते. त्यांच्या शेजारून एक सायकलस्वार जात असताना अचानक कार त्यांच्या अंगावर आली. यामध्ये होमेश उरकुडे (वय 24 रा .कोसेटोला. गोरेगाव)हेमराज राऊत (54 रा. कारंजा ) कादिर शेख (38 रा. फूलचूर)तसेच सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे .त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🤙 9921334545