कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे
इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्ष विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. या नवनियुक्त विद्यार्थी संघटना कार्यकारीणी विविध भागातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले. यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते व सानिका आवाडे यांच्या उपस्थितीत युवा नवनियुक्तांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
पुढील पदाधिकारी नवनियुक्त ताराराणी युवक आघाडी इचलकरंजी शहर सरचिटणीस शुभम वाळघिंडे, विद्यार्थी संघटन-इचलकरंजी शहर-सरचिटणीस ओमकार मगदूम, एस.आय.टी डिप्लोमा कॅालेज अध्यक्षअथर्व अजित जाधव, उपाध्यक्षजयद रियाज जमादार, ताराराणी पक्ष विद्यार्थिनी शहराध्यक्ष स्वप्नाली माळी, ताराराणी पक्ष विद्यार्थिनी-कार्याध्यक्ष अश्विनी भतगुणकी, विद्यार्थी संघटना श्रीमती. आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय-अध्यक्ष तैयबा बहादुर लाटकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी ताराराणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटील, ताराराणी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघटना सुहास कांबळे, ताराराणी शहराध्यक्ष फहिम पाथरवट, ताराराणी युवा जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे मामा, ताराराणी युवा शहराध्यक्ष सतीश मुळीक, मा. नगरसेवक राजू बोंद्रे, तौसीफ खाटीक, सौरभ परदेशी, बिलाल पटवेगार, विनायक आंबिल ठोके यांच्यासह आवाडे समर्थक उपस्थित होते.