शासनाच्या निषेधार्थ शिवसेना पन्हाळा शाहुवाडी विधानसभेच्या वतीने निषेध -माजी आमदार सत्यजित आबा सुरडकर

कुंभोज प्रतिनिधी  : विनोद शिंगे

मलकापूर येथे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ८ महिन्यातच कोसळला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या या भ्रष्ट शासनाच्या निषेधार्थ शिवसेना पन्हाळा शाहुवाडी विधानसभेच्या वतीने शिवसेना मा.आमदार सत्यजित पाटील व शेकाप नेते भाई भरत पाटील, व रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.नामदेव गिरीसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले.

 

 

तरी शिवसेना, रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती, शेकाप,युवासेना,महिला आघाडी व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी,शिवसैनिक, तालुकाप्रमुख, नगरसेवक, सभापती, जि प सदस्य , पंचायत समिती सदस्य व महाविकास आघाडी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.