कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
हातकणंगले तालुक्यात दहीहंडीच्या नावाखाली चाललेला महिलांचा नाच कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे? यामुळे आपण तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या नादाला लावत असल्याचे दिसत असून सदर कार्यक्रम आयोजित करण्याया राजकीय व्यक्तींनी आपण पुढे काय समाजसेवा करणार याचीही पहिली झलक आहे? सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून नंगानाच करणाऱ्या व तो करण्यासाठी भाग पाडणाऱ्या राजकीय व्यक्तींना वेळेस त्यांची जागा दाखवून द्या अशी आव्हान आगामी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार व कुंभोज माजी उपसरपंच अजित देवमोरे यांनी व्यक्त केले आहे.

पक्ष,पैसा,मटन,दारू बघून मतदान करायचे की,आपल्या मुलांचे भविष्य घडावे व आपल्या गावाचा व या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रामाणिक इच्छा आहे का? त्यासाठी मला हातकणंगले विधान मतदार संघातून निवडून द्यावे अशी विनंती कुंभोज ग्रामपंचायत माजी उपसरपंच अजित देवमोरे यांनी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींच्या जवळ केली आहे.
