शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ देण्याऐवजी इतर ‘9’ वस्तू देण्याचा केंद्रीय सरकारचा निर्णय

दिल्ली : भारताचे केंद्र सरकार हे देशातील गरजूं गरिबांना रेशन कार्डद्वारे मोफत रेशन देत असतं. अनेक वर्ष शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता यात बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोफत तांदूळ ऐवजीआता इतर नऊ वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

 

मोफत रेशन योजने अंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं. यामध्ये लोकांना मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र या मध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी इतर नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ ,मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश असणार आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.