शिराळा: मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालवला. अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शिराळा येथे बुधवारी झालेल्या भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्यात केली. शिराळा मतदार संघातील जागा ही भाजपलाच मिळेल आणि भाजप जिंकेल असा दावा त्यांनी केला.
मराठा आरक्षण हे केवळ शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यामुळे सर्वोच्च न्यायालयात फेटाळले गेले. या उलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपने मराठा आरक्षण दिलं. उच्च न्यायालयात टिकवून देखील दाखवलं असे विनोद तावडे यांनी सांगितले.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजपा नेते सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे नेते सम्राट महाडिक, सी .बी पाटील, संपतराव देशमुख, केदार नलावडे, जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.