कोल्हापूर: हलकर्णी फाटा येथे युवासेना विस्तारक डॉ सतीश नरसिंग व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे व युवासेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हलकर्णी येथे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो शक्ती कायदा आणला होता त्या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. या संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शांताताई जाधव , तालुका संघटक विक्रम मुतकेकर, युवा सेना तालुका प्रमुख गणेश बागडी, युवा सेना तालुका प्रमुख किरण नागुर्डेकर ,तालुका समन्वयक नितीन सुतार, युवती सेना र्कीती पाटील, रेणुका भाटे, प्रविण कोळशेक,भरमु बिर्जे व युवासेना, युवती सेना, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.