कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय मधील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत 29 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवारी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली.
यामध्ये एकूण 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. के. शानेदिवाण यांनी आपल्या मनोगतात क्रीडा संस्कृती वाढावी व सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा तसेच शैक्षणिक ताणतणावातून मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास त्याचा महत्त्वाचा फायदा होईल असे प्रतिपादन केले. यावेळी न्यक समन्वयक डॉ आर डी मांडनीकर, रजिस्टर रवींद्र भोसले अधीक्षक मनीष भोसले व प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेचे नियोजन जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत पाटील व श्री. प्रशांत मोटे यांनी केले.