मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी 900 हून अधिक उमेदवारांनी केले अर्ज

मुंबई:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी 900 हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये भुजबळांच्या विरोधात सात उमेदवारांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळवण्यासाठी विविध पक्षाचे प्रमुख नेते प्रयत्नशील आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदार संघातून सहा इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांना अर्ज केले आहेत. त्यामुळे मागच्या आठवड्यात पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे पाटील यांना भेटायला अंतरवली सराटी येथे आले होते.

जरांगे पाटील यांनी इच्छुकांना त्यांची माहिती आणि अर्ज 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान सादर करण्याचे आवाहन केले आहे.