पॅरिस पॅरालिंपिक आज पासून;

पॅरिस:टोकियो पॅरालिंपिक मध्ये भारताने पाच सुवर्ण,आठ रौप्य, सहा ब्राॅझ पदका सह एकूण 19 पदके पटकावले होते. त्यावेळी भारताला पदकतालिकेत 14 वे स्थान मिळाले होते. आता तीन वर्षानंतर  पॅरिसमध्ये पॅरालिंपिक होत आहे यामध्ये भारताला 25 पेक्षा जास्त पदके मिळण्याची अपेक्षा आहे. या क्रीडा महोत्सवात भारताकडून बारा खेळांमध्ये 84 खेळाडूंचा सहभाग असून यंदा दुहेरी आकड्यामधे सुवर्णपदक जिंकण्याचा मानसही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

4400 खेळाडू पॅरिस मध्ये पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 11 दिवस लागणाऱ्या या स्पर्धेमध्ये 22 खेळांमध्ये एकूण 549 पदकासाठी स्पर्धा होईल.