पुण्यात तरुणीचा निर्घूण खून; मृतदेहाचे तुकडे करून फेकले नदीत

पुणे: पुण्यातील खराडी भागात नदीपात्रामध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला या मृतदेहाचे तुकडे करुन नदीपात्रात फेकल्याचे आढल्याने एकच खळबळ उडाली. आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात कन्स्ट्रक्शन चे काम चालू आहे. तिथेच असलेल्या नदीपात्रात एका तरुणीचे हात ,पाय, डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरुणीची ओळख अद्यापही पटलेली नाही. मृत तरुणी ही 18 ते 30 या वयोगटातील आहे.
आरोपीने तरुणीची ओळख पटू नये तसेच पुरावे नष्ट व्हावेत यासाठी धारदार शस्त्राने शरीराचे तुकडे केले या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात चंदननगर येथील पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.