नाशिक :नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये शेतातील विहिरीत दोन मुलींचे मृतदेह आढळले आहेत. 26 ऑगस्ट रोजी ही घटना कळवण परिसरात घडल्यामुळे खळबळ उडाली.माधुरी मोरे (20वर्ष )आणि गीतांजली एखंडे (13 वर्षे )असे मृत मुलीचे नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी आणि गीतांजली या दोघी मैत्रिणी होत्या. त्या 25 ऑगस्ट ला घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता ,शेतातील विहिरीमध्ये या दोन मुलींचे मृतदेह आढळले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.