सिंधूदुर्ग: नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्यात आलं होतं.परंतु वर्षभरातच हा पुतळा कोसळला.
4 डिसेंबर, 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. हा पुतळा कोसळण्यामागचे कारण अद्याप समजलेलं नाही.