बारामती : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली.त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? अशा चर्चा रंगू लागलया आहेत.प्रसार माध्यमांनी या संदर्भात अतुल बेनके यांना विचारले असता ते म्हणाले की मी अजित पवार गटाकडूनच लढणार आहे मात्र शरद पवारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.

अतुल बेनके आणि शरद पवारांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी बारामती मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांचे एकत्र बॅनर झळकलं. या फलकावर शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे सुनिता पवार रोहित पवार यांचा एकत्रित फोटो आहे.
