कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील :
खासदार शाहू महाराज यांची सदिच्छा भेट समरजीत घाटगे यांनी घेतली . यावेळी समरजीत घाटगे म्हणाले की, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज महाराजांना भेटण्याचा योग आला, यावेळी मनमोकळ्या गप्पा आणि अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली.
भेटीदरम्यान अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असता, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपण समर्थपणे पुढे नेण्यासाठी पुढील वाटचालीला सुरुवात करत आहोत असे सांगितले.