गणेश चतुर्थीपूर्वी रस्ते दुरुस्त करा ,अन्यथा आंदोलन करू :राजू दिंडोर्ले

कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत
कोल्हापूर मध्ये खराब रस्ते खड्ड्यांची समस्येचा प्रश्न नेहमी उद्भवतो. गणेश उत्सव ही जवळ येत आहे या खराब रस्त्यातून गणपती बाप्पाचे स्वागत करायचे का? असा प्रश्न राजू दिंडोर्ले यांनी केला.

कोल्हापूर महापालिका प्रशासन हे फक्त मंत्री कोल्हापूर मध्ये येणार असतील, त्याच वेळी रस्त्याची डागडुजी केली जाते . एरवी या रस्त्यांच्या दुरावस्तीकडे दुर्लक्ष केलं जातं. दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी माजी नगरसेवक व मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी केली.

🤙 9921334545