महाराष्ट्रातील लहान मुलींच्या लैंगिक अत्याचाराचा विरोधात महाविकास आघाडीचे गांधीनगरात मुक आंदोलन

कोल्हापूर:    बदलापूर, कोल्हापूर, पुणे, अकोला, नागपूर, मुंबई येथे लहान मुलींच्या वरती लैंगिक अत्याचार करून,कित्येक लहान मुलींच्या त्या नराधमानी हत्या केल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ गांधीनगर बाजारपेठेत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून, काळे झेंडे दाखवून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

 

 

यावेळी करवीर तालुकाप्रमुख बोलताना म्हणाले की, दिनांक २४ रोजी सनदशील मार्गाने महाराष्ट्र बंद करून या घटनेचा निषेध करण्यात येणार होता, न्यायालयाने बंद करण्यात येऊ नये असा आदेश दिला.महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक गावाच्या चौकात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन व तोंडाला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करावे असा आदेश दिला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा निषेध करत गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे राजू यादव बोलताना म्हणाले, त्याप्रमाणे गांधीनगर बाजार पेठेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांनी ही राज्य शासनाचा निषेध केला.
त्यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, ग्रा.सदस्य विराग करी, सनी चंदवाणी, निवास तामगावे,मा. प्रभारी सरपंच सोनी सेवलानी, निशा कुकरेजा, शरद माळी, जितू कुबडे, वीरेंद्र भोपळे, दिलीप सावंत, दीपक फ्रेमवाला, धीरज टेहल्यानी, दीपक अंकल, दीपक पोपटाणी, जितू चावला, किशोर कमरा, सुनील पारपाणी, अर्जुन मिसाळ, महेश छाब्रिया, कैलास जाधव, शिवाजी लोहार, योगेश लोहार, अमित लालवाणी, अजय प्रभावळे, रवी जाधव, संभाजी मोहिते, राजेश सचदेव, सुरेश सचदेव, संजय कुसाळे, गणेश घाडगे, राजू पोवार, शंकर चंदवानी आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, काँग्रेस चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545