मुंबई: उत्तर प्रदेश मधील एका मुस्लिम महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे पतीने तिहेरी तलाक दिल्याचा दावा महिलेने केला.
पीडितेने म्हटलं आहे की लग्न होऊन, अयोध्येत गेल्यानंतर तिथले रस्ते,सुशोभीकरण, अयोध्या धाम आणि इतर विकासात्मक कामे प्रचंड आवडले. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती नवऱ्यासमोर केली.यामुळे चिडलेल्या पतीने महिलेला माहेरी पाठवले, तसेच तिच्या अंगावर गरम डाळ ओतली. आणि मारहाण केली. तसेच नवऱ्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ही केला.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.