मुंबई :देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे देश हादरला आहे. अशीच एक घटना कर्नाटकातील उड्डपी जिल्ह्यात घडली आहे.प्रियकरानेच आपल्या मित्रासमवेत महिलेवर सामुहिक बलात्कार केला. संबंधित महिलेची इंस्टाग्राम वर एका तरुणाची ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
मिळालेल्या माहितीनुसार,23 ऑगस्ट रोजी कारकला येथे मधमाशी पालन होत असलेल्या ठिकाणी ही महिला उभी होती त्या ठिकाणी एका पांढऱ्या कारमधून आरोपी तिथे आला आणि त्या महिलेचे अपहरण करून तिला जंगलामध्ये घेऊन गेला दुसऱ्या कारमधून आरोपीची दोन मित्र मद्य घेऊन आले आणखी मद्य महिलेला जबरदस्तीने पाजले. बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने आळीपाळीने कार मध्ये त्या महिलेवर अत्याचार केला सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपी कारमधून महिलेला तिच्या घरी घेऊन गेला. यावेळी तिथे असलेलया लोकांनी कारमध्ये बघितले असता. ही महिला बेशुद्ध अवस्थेत दिसली. लगेच त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी तातडीने तिथे येऊन तिच्यावर उपचार आणि वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले. चौकशी केल्यानंतर महिलेवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली.पीडितेच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. अपहरण बलात्कार आणि इतर कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.