भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीने, दुचाकीला उडवले: दोघांचा मृत्यू

सातारा: सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले आणि या अपघातात एकाच्या जागीच मृत्यू झाला , तर दुसऱ्या जखमी तरुणाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता,त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात दहिवडी जवळील बिदाल शेरेवडे भागामध्ये झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अपघातानंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत