विधानसभा निवडणूक पुर्वी भाजपला मोठा धक्का !


कोल्हापुर:       महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार आहे.भाजपचे दोन बडे नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरचे भाजप नेते समरजीत घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत.

समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंद्रापूरचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.