‘जनता सहकारी बँकेने केला १५हजार कोटींचा व्यवसाय पार’

कोल्हापूर: ‘जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे’ च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर व उचगाव गांधीनगर शाखेच्या खातेदारांचा ग्राहक मेळावा कोल्हापूर येथे पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थितीत होते. “महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात मिळून बँकेच्या एकूण 71 शाखा कार्यरत असून ,बँकेने 15000 कोटींचा टप्पा पार केला आहे .”असे शाखेचे शाखा व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांनी सांगितलं. निवडक खातेदारांनी बँकेविषयी आपले मनोगत व्यक्त केलं.

या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक ही उपस्थितीत होते .धनंजय महाडिक म्हणाले की, “मी या बँकेचा 1996 सालापासून चा खातेदार आहे व आमच्या प्रत्येक व्यवसायाची सुरुवात जनता बँकेमध्ये खाते उघडून झाली आहे. या बँकेची भरभराट होवो अशा सदिच्छा ही त्यांनी दिल्या.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश राव यांनी केले तर आभार बँकेचे संचालक श्रीकांत पोतणीस यांनी मानले.