“शेख हसीना यांच्यावर खटला चालवा” बांगलादेश मधील आंदोलकांची मागणी;

दिल्ली: शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या, त्यानंतर मोहम्मद युनिस यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारलं  आहे. मात्र बांगलादेश मधील आंदोलकांचा आक्रोश शांत झालेला नाही. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यासह आंदोलन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहेत . शेख हसीना यांना भारतातून परत आणलं पाहिजे,आणि त्यांच्यावर खटला चालवून त्यांना शिक्षा दिली पाहिजे . अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे .

 

आंदोलन विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की, ‘आमची लढाई केवळ भ्रष्टाचाराच्या विरोधात होती .आम्ही याआधी ही हिंदू सोबत बसत होतो, आणि यापुढेही राहू . देशातील प्रत्येक संस्था नष्ट करण्यात आली.’  दरम्यान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात टाका येथे गुन्हा दाखल झाला आहे . त्यांच्यावर बांगलादेश मधील आंदोलनादरम्यान दोन लोकांच्या हत्या प्रकरणी दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत.