कोल्हापुरातील 24 उद्योगांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून नोटीसा

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पावसाळा आला की , दूषित पाण्याची समस्या वाढते .एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे बारा महिने समस्या असते.
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित एमआयडीसी मध्ये उद्योगांची संख्या जास्त आहे. या तिन्ही एमआयडीसी परिसरात उपनगरांची संख्या मोठी असल्याने कंपन्यामधून प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. या एमआयडीसीमध्ये पोल्ट्री उद्योगासह विविध उद्योग कार्यरत आहेत या उद्योगामुळे प्रदूषण होणार नाही याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडकडून वारंवार सूचना दिला जातात.

 

मात्र काही कंपन्या सूचनांचे पालन करत नसल्याने महामंडळाने त्यांच्यावर कारवाईचा भडगाव उगारला गेला आहे. गेल्या सात महिन्यात 24 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे .या तीन एमआयडीसी मधील चार कंपन्यांना निर्देश दिले आहेत तर तीन कंपन्यांना अंतिम आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रदूषण करणाऱ्या पाच कंपन्यासाठी प्रस्तावित आदेशही काढण्यात आले आहेत.
दरम्यान औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार विविध उपक्रम राबवले जातात कंपन्यांमध्ये जनजागृती केली जाते तरीही काही कंपनीकडून प्रदूषण होत आहे.प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून ज्या कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे, अशा कंपन्यांना नोटीशीला उत्तर देण्यासाठी ठराविक मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी काय खुलासा केला आहे यावरून त्यावर कोणती कारवाई करायची हे ठरवली जाते.