पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्याचा हार्ट अटॅक ने मृत्यू

मुंबई: बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र यांना प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषदेत अचानक हार्ट अटॅक आला . आणि यामध्ये त्यांचे निधन झालं. कर्नाटकची राजधानी बंगळुरु मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालाच्या निर्णयाला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना माइक वर बोलत असतानाच काँग्रेस नेते रवींद्र अचानक खुर्चीवरून खाली पडले.
रवींद्र यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. हार्ट अटॅक ने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

🤙 9921334545