मुंबई: बदलापुरातील एका नामांकित शाळेत तीन ते साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे .या घटनेनंतर बदलापूर शहर हादरला असून, संताप जनक बाब म्हणजे बदलापूर पोलिसांनी इतक्या संवेदनशील प्रकरणात तब्बल 12 तासानंतर गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,शाळेतील हा नराधम पीडीताचे शोषण करीत होता. त्यातील एका पीडीत मुलीने घरच्यांना याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित कुटुंबाला मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल होण्यासाठी वाट पाहावी लागली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पिडीत कुटुंबासोबत पोलीस ठाण्यात येत पोलिसांना याची माहिती देत हा प्रकार समोर आणला होता .त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी पीडित कुटुंबासोबत मध्यरात्रीपर्यंत थांबल्यावर, पोलिसांना शाळेतील अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करावा लागला.मात्र इतक्या संवेदनशील घटनेबाबत पोलिसांनी दाखवलेल्या बेजबाबदार आणि हलकर्जीपणामुळे पोलिसांवर टीका होत आहे. या प्रकरणात पोलिस अधिक माहिती घेत आहेत.