कोल्हापूर :राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची सर्वत्र चर्चा आहे महिला वर्गातूनही आनंद व्यक्त केला जात आहे रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत .बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तोंड भरून कौतुक केलं.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ट्विट करत महाराष्ट्र राज्य सरकारचे कौतुक केले आहे. तिने लिहिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक महिलांना आता दर महिन्याला आर्थिक हातभार लागेल. अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही मोठी झेप आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे खूप खूप अभिनंदन.