कोल्हापूर: विनापरवाना कार्यक्रम करुन नियमांचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने गौतमीला अटी आणि शर्थींसह जामीन मंजूर केला आहे.
मागच्या वर्षी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाईपलाईन रोडवर पार पडला होता. या कार्यक्रमासाठी तिने संमती घेतली नव्हती. या प्रकरणावरुन गौतमी पाटीलवर पोलिसांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे. मागील वर्षी गणपती उत्सवा दरम्यान रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला होता. यानंतर गौतमी पाटील तिचे मॅनेजर आणि गणपती मंडळाचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.