दिल्ली :भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट शनिवारी सकाळी मायदेशी परतली आहे. दिल्ली विमानतळावरून बाहेर आल्यानंतर तिथे आलेल्या चाहत्यांनी विनेशचे जोरदार स्वागत केले. हे पाहून विनेश फोगटला अश्रू अनावर झाले.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या कुस्तीच्या सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश फोगट अपात्र ठरली होता. तेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाबाबत, विनेशने सामायिक रौप्य पदक देण्यासाठी क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडेही अपील केले होते, परंतु १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिची याचिका सीएएसने फेटाळली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन विनेश फोगट जेव्हा मायदेशी परतली तेव्हा तिचे जोरदार स्वागत पाहून ती भावुक झाली.