PKL लिलावाच्या पहिल्याच दिवशी ‘हा’ ठरला महागडा खेळाडू;

मुंबई :प्रो कबड्डी लीग २०२४ चा ११ व हंगाम लवकरच सुरु होणार आहे . त्यापूर्वी प्रो कबड्डी लीग २०२४ च्या ११व्या हंगामातील लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण आठ खेळाडूंवर कोटींची बोली लागली.

 

१५ आणि १६ ऑगस्ट रोजी मुंबईत होत असलेल्या या लिलावात सचिन तंवर सर्वाधिक बोली लागणार खेळाडू ठरला. तामिळ थलायवासने स्टार रेडर सचिन तन्वरसाठी २ कोटी १५ लाखांची बोली लावली. सचिनची मूळ किंमत तीस लाख रुपये होती. सचिन तन्वर हा ‘करो या मरो’ रेडचा स्पेशालिस्ट खेळाडू आहे. अनुभवी रेडर परदीप नरवाल दुसऱ्यांदा बेंगळुरू बुल्समध्ये सामील होणार असून, फ्रँचायझीने त्याला ७० लाख रुपयांना खरेदी केले आहे.

🤙 9921334545