कोल्हापूर – ‘ भारत माता कि जय – वंदे मांतरम – जय जवान – जय किसान या देशभक्तीपर घोषणा च्या जल्लोषात स्वामी विवेकानंद ट्रस्ट च्या ‘ देशरक्षा बंधन – या एक राखी सीमेवरील जवानांसाठी” उपक्रमात दोन लाख राख्या टी ए मराठा 108 बटालियन च्या जवानाकडे सुपुर्त करण्यात आल्या . शाहू स्मारक भावलात पार पडलेल्या या देशभक्तीपर सोहळ्यामध्ये कोल्हापूर सह पंचक्रोशीतील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच विविध महिला बचत गट सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते .

प्रारंभी शिवगंधार वृद्ध समुहाच्या शिवराज पाटील – नरेंद्र पाटील स्वप्नील पन्हाळकर सह कलाकारानी विविध देशभक्तीपर गीते सादर करून कार्यक्रमाचा देशभक्तीपर माहोल निर्माण केला . यानंतर शिवाई फाऊंडेशनच्या जयश्री किशोर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांनी महाराष्ट्र गीत सादर करून सर्वांची मने जिंकली तसेच शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्केटिंग नृत्य करत तसेच कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ . सायली कचरे यांचे मार्गदर्शना खाली देशभक्तीपर नृत्ये सादर केली .
प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना अध्यक्ष किशोर घाडगे यांनी कारगील युध्दापासून गेली 25 वर्ष विवेकानंद ट्रस्ट घेत असल्याचे सांगून महानगरपालिकेने महाराणी ताराराणीच्या कर्मभूमी भूमीत सैनिकी हायस्कूल चालू करावे ,अशी आग्रहाने मागणी आम्ही सातत्याने करत आहोत त्याचा त्याची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली . भगिनी मंचच्या वैशाली राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरचा अभिमानाचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी महानगरपालिकेने सैनिकी स्कूल चालू करावे ही मागणी सुद्धा असून त्यासाठी व्यापक जनमत तयार करावे अशी अपेक्षा व्यक्त करत या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या . पारंपरिकबहिण भावाच्या प्रेमाच्या देश रक्षाबंधनाचा आयाम देणारा हा उपक्रम शालेय मूल्य शिक्षणाचा भाग म्हणून विविध ठिकाणी स्वीकारण्यात आला आहे. कोल्हापूर उत्सव पश्चिम महाराष्ट्रात आणि गोव्यापासून थेट बिहारपर्यंत याचे अनुकरण होत आहे. आणि कोल्हापूरकर म्हणून याचा सर्वांना अभिमान असावा कोल्हापूर भविष्याच्या करावयाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार सचिव राजेंद्र मकोटे यांनी व्यक्त केला .निवृत्त सुभेदार आणि सैनिक कल्याण मंडळाचे संघटक एन एम पाटील यांनी सीमेवरील लढणाऱ्या जवानांना या दुर्गम भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वांच्याकडून जाणारा राख्या ह्या त्यांची मानसिक बळ वाढवणाऱ्या ठरतात असे नमूद केले . टी ए मराठा 108 बटालियनच्या वतीने हवालदार अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना हा उपक्रम आम्हाला अधिक प्रेरणा देणार असल्याचे मत व्यक्त केले .
शेवटी आभार जेष्ठ संचालक मालोजी केरकर यांनी मानले . टी ए मराठा बटालियन चे सुभेदार संजय वाघे सह हवालदार संजय पवार सखाराम पाटील अजित पाटील नायक संदीप कोरे लान्स नाईक बाबू घोरपडे आदींनी या राख्याचा स्वीकार केला .सर्व आलेल्या विद्यार्थ्यांना महालक्ष्मी लाडू खाऊ वाटप करण्यात आले . असून या उपक्रम यशस्वीतेसाठी किशोर घाटगे, राजेंद्र मकोटे, कमलाकर किलकिले, किरण नकाते, सुखदेव गिरी, ,डॉ. सायली कचरे, प्रशांत बरगे, महेश कामत, मालोजी केरकर, धनंजय नामजोशी, तुषार साळगावकर, सौ. यशश्री घाटगे, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, अशोक लोहार, नंदू गुरव ,महादेव आयरेकर ,शाम बरगे , शाहू स्मारक चे संदीप माने आदिसह समन्वय कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न विशेष प्रयत्न केले .या माझी नगरसेविका मैत्रीण फौंडेशनच्या माधुरी किरण नकाते सोहळ्यास जायटस् क्लब ऑफ रंकाळा चौपाटीच्या बबिता जाधव ,अनिता काळे, डॉ . शितल पाटील , कला शिक्षिका सुनिता मंगाणे ब्रम्हाकुमारी सुनिता बेन यांच्यासह शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय व कर्मवीर इंग्लिश स्कूल चे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .
