‘बँकांमध्ये लाडक्या बहिणीची गर्दी’

कोल्हापूर: रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ एकत्रित तीन हजारचा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर जमा करण्यास दोन दिवसापासून सुरुवात केली आहे.

सोमवारी रक्षाबंधन असून त्यापूर्वी दोन दिवस बँकांना सुट्टी असल्याने महिलांनी पैसे काढण्यासाठी शुक्रवारी बँकेत गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे .खात्यावर पैसे जमा झालेला मेसेज मिळेल तसे महिलांची पावले बँक शाखेकडे वळत आहेत. त्यामुळे बँकांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे.