मुंबई: मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सेक्युलर नागरी संहिता हे मोदी बोलले म्हणजे त्यांनी हिन्दुत्व सोडलं. वव्फ बोर्ड बाजुला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जात असेल आणि तिथे तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर वव्फ पासून हिंदू संस्थान असो वा कुठल्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेड वाकडं त्यावर काहीही होऊ देणार नाही .असं सांगत उद्धव ठाकरे यांनी वव्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवर टीका केली.