‘केशवराव भोसले नाट्यगृह आगीची’ एफआयआर नोंद नाहीच

कोल्हापूर :संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची एफआयआर महापालिकेने केलेली नाही. जळीत नोंद म्हणून पोलिसांत नोंद करून , एफआयआर झाल्याचे प्रशासन खोटे सांगत आहे.

                                           

प्रशासनाचा हा खोटारडेपणा बुधवारी नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन समितीच्या शिष्ट मंडळी आणि प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांच्यासमोर उघड केला.बैठकीत प्रशासनास एफआयआरची प्रत समिती सदस्यांना दाखवता आली नाही म्हणून समितीचे सदस्य बाबा इंदुलकर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या वास्तूमिटवण्यासाठी हे प्रकरण दाबले जात आहे ,वरिष्ठांच्या दबावामुळेच एफआयआर होत नाही, असा आरोप केला.