शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा

कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील

फुलेवाडी – क्रांतिसिंह नाना पाटील नगर – फुलेवाडी रिंग रोड येथील मॉडर्न शिक्षण संस्थेच्या शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मेडियम स्कूल व दक्षिण कोल्हापूर उपशहर संघटिका सौ अनिता ठोंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

यावेळी उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष डॉ.संदेश कचरे, मॉडर्न शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. सायली कचरे,जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उतुरे,उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे,शहर संघटिका जाईदा खान,महिला संघटिका गीता गायकवाड, युवतीसेना गौरवी पाटील, युवा जिल्हा अधिकारी मंजित माने, उपशहरप्रमुख समरजित जगदाळे, विशाल चव्हाण वाहतूक सेना उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख जयदीप पाटील,सुहास चव्हाण, संग्राम पाटील प्रवीण कांबळे,अशोक पवार ,विवेक काटक रआदि मान्यवर उपस्थितीत होते .

🤙 9921334545