मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण ,आंदोलन, शांतता रॅली या मार्गाने आरक्षणाची मागणी केली आहे पण आता तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद करतो. आरक्षण देणार नसाल तर माझ्यापुढे पर्याय नाही माझ्या समाजाचे मतदान घेऊन माझ्या समाजाचे वाटोळे करणार असाल, तर तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही .
मला हलक्यात घेऊ नका राजकारणात आलो तर तुमचा सुफडा साफ होईल असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
गोरगरीब मराठा शेतकऱ्यांचे राज्य आणल्या शिवाय मागे सरकणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली