पिस्तुलाचा धाक दाखवत अज्ञाताने ‘कोल्हापुरातील व्यापारी कुटुंबियांला धमकावले’

कोल्हापूर : पोलीस असल्याचे सांगून एका अज्ञाताने पिस्तुलाचा धाक दाखवून शाहूपुरी येथील व्यापारी संदीप नष्टे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावले याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती व्यापारी नष्टे यांच्या दारात आला, ‘संदीप नष्टे यांच घर आहे का’? अशी विचारणा करून तो थेट घरात घुसला. पोलीस असल्याचे सांगून तुमच्या विरोधात पोलीस तक्रार आहे, तुम्ही तडजोड करून प्रकरण मिटवणार आहात की, वाढवणार आहात अशी त्यांनी विचारणा केली. त्याला नाव विचारताच त्याने वाद घालायला सुरुवात केली . हा कोणीतरी भामटा असावा असा असा संशय कुटुंबियांना आल्यानंतर त्यांनी त्याला घरातून बाहेर जायला सांगितले. त्यावेळी संशयिताने कमरेची पिस्तूल काढून संदीप यांच्या दिशेने रोखून धरली प्रकरण मिटवले नाही तर तुम्हाला जड जाईल, कोणालाही सोडणार नाही अशी तो धमकी देऊ लागला. पिस्तूल पाहताच नष्टे कुटुंब घाबरले. गोंधळ वाढता संशयिताने काढता पाय घेतला. संशयताचा उद्देश किंवा पैसे काढण्याचा असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

🤙 9921334545