कोल्हापूर : भावाने बहिणीचे रक्षण करणे ,याचे प्रतीक म्हणून बहिण भावाला राखी बांधते .पण वेळ प्रसंगी बहिण ही भावाचे रक्षण करू शकते, अशी एक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात घडली.
शिराळ्यातील सुजाता संदीप उबाळे या बहिणीने धाकटा भाऊ धनाजी गायकवाड यास स्वतःची किडनी देऊन जीवदान दिले, व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. धनाजीस सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाला त्याचे दोन्ही किडन्या पन्नास टक्के काम करत नसल्याची आढळून आले. किडनी बदलण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. सुरुवातीला आई किडनी देण्यास तयार झाल्या,मात्र वयाच्या अडचणीमुळे त्या किडनी देऊ शकल्या नाहीत . यावेळी सुजाता यांना विचारले असता त्या भावासाठी किडनी देण्यास तयार झाल्या. आठ ऑगस्ट ला किडनी देण्याची शस्त्रक्रिया करण्याची ठरली .धनाजी व सुजाता यांच्यावर डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालय ,पुणे येथे वृषाली पाटील व त्यांचे सहकार्याने यशस्वी शस्त्रक्रिया केली.