कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे ‘मीटर माळ ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंगल परिसरात सांबराची शिकार केल्याप्रकरणी तिघांना गगनबावडा वन विभागाने रंगेहात पकडले . सुभाष बापू पाटील, जालिंदर कृष्णात पाटील ,विठ्ठल कोंडीबा पाटील अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांबराची बंदुकीच्या साह्याने शिकार केल्यानंतर मृत्य सांबराचा शिरच्छेद करताना संशयताना गगनबावडा वन विभागांनी रंगेहात पकडून ताब्यात घेतले .यावेळी दोघे बंदूक व शस्त्रासह प्रसार झाले . यातील पांडुरंग बापू पाटील हा वनविभाग साळवन दूरक्षेत्र येथे स्वतः हजर झाला असून संशयित संजय लहू पाटील हा बंदुकीसह फरार आहे . वन विभागाने वन्यजीव कायद्याप्रमाणे चौघावर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा तपास सुरू आहे . चौघा संशयित आरोपीना न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. उपवनरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रियांका पवार, वनपाल संभाजी चरापले , वनरक्षक नितीन शिंदे, ओमकार भोसले ,प्रकाश खाडे, वनसेवक धोंडीराम नाकाडे, मुबारक नाकाडे, दादू पाटील ,नाथा कांबळे यांनी कारवाई केली पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रियांका पवार करत आहेत.