दिल्ली: बांगलादेशात गृहयुद्ध चालू आहे, अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारत सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट जाहीर केला आहे.
दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली . बांगलादेशातील परिस्थिती बघता दिल्ली NCR मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.