कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे गणेशोत्सव मिरवणुक शिस्तीबाबत पोलीस अधिक्षकांना निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत

 गणेशोत्सव म्हणजे बालकांपासून वृध्दांपर्यंत सर्वानाच आनंद देणारा सण . कोल्हापूरची गणेश विसर्जन एकत्रित मिरवणुक साधारणपणे १९७४ च्या दरम्यान खासबाग मैदानापासून सुरु झाली. या पारंपारिक मिरवणुकीमध्ये त्याकाळी शंभरा हून कमी मंडळाचा सहभाग असायचा त्याकाळी दुपारी ४ वाजता चालू झालेल्या मिरवणुकीचा शेवटचा गणपती रात्री ९ च्या दरम्यान अंबाबाई मंदिराजवळ असायचा त्यामुळे रात्री ११पूर्वी मिरवणुक संपायची त्याचा मार्ग म्हणजे शाहू मैदान मिरजकर तिकटी,बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे, पंचगंगा नदीघाट असा असायचा

अलिकडच्या काळामध्ये कोल्हापूरात दोन हजाराहून अधिक मंडळे गणेश प्रतिष्ठापना करतात ,पाचशेहून अधिक मंडळे मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. यामध्ये पूर्वीचाच मार्ग, रस्त्यांची लांबी रुंदी तीच आहे पण सहभागी मडळांची संख्या शेकडोंनी वाढली आहे. त्यामुळे गर्दी वाढली प्रेक्षकांची संख्याही वाढली याचा गांभीर्याने विचार होणे गरजेच आहे. पोलीस विभागाने यामध्ये काही पर्यायी मार्ग काढून प्रयत्न केले आहेत. याबाबत दुमत नाही.गेल्या चार वर्षापासून  सर्व गणपती रंकाळा इराणी खणीत विसर्जन केले जातात ही खरोखर चांगली आणि सर्वाना पर्यावरणपुरक विचार देणारी गोष्ठ आहे .अलिकडच्या काळात वाढलेली मंडळांची संख्या, प्रेक्षकांची संख्या, बदललेले विसर्जन ठिकाण याचा विचार करुन पारंपारिक वादये, चित्ररथ असणाऱ्या मिरवणुकीसाठी स्वतंत्र्य पर्याची मार्गांची व्यवस्था केल्यास गर्दी कमी होऊन लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल व मिरवणुक कमीत कमी
वेळेत संपेल. याकरिता सध्या मिरवणूकीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे खासबाग मैदान,मिरजकर तिकटी आहे. त्या ठिकाणी एक पर्यायी मार्ग म्हणजे मिरजकर तिकटी, दैवज्ञबोर्डिंग, खरी कॉर्नर मार्गे पद्माराजे हायस्कूल मार्गे पाण्याचा खजिना ते ८ नं. शाळा मार्गे
जुना वाशी नाका ते इराणी खण हा ठेवावा . त्याचबरोबर महाव्दार रोड मार्गे जाणाऱ्या मंडळांना अंबाबाई मंदिर ,महाव्दार चौक, ताराबाई रोड मार्गे रंकाळा चौपाटी तेथून संध्यामठमार्गे जुना वाशी नाका मार्गे इराणी खण, असा ठेवावा. यामध्ये शिवाजी पेठ परिसरातील मंडळेही त्या त्या भागातून स्वइच्छेने सहभागी होतील व पद्माराजे हायस्कूलमार्गे असणाऱ्या मार्गात शिवाजी पेठेतील मंडळे खरी कॉर्नरला सहभागी होऊ शकतील.. या पर्याची मार्गामुळे मिरवणुकीचे विकेंद्रीकरण होऊन गर्दीचा व वेळेचा अपव्यय निश्चितच कमी होईल त्याचबरोबर सर्वसाधारणपणे इराणी खणीकडे विसर्जनाला जाणाऱ्या बहुसंख्यमंडळाची वादये ही गंगावेश चौकात बंद करुन मोजके कार्यकर्ते रंकाळावेश मार्गे इराणीखणीकडे विसर्जनाला जाताना त्या वेळी त्या मंडळाची इतर देखाव्यावची वहाने वादयवृंदाची रिकामी वाहने पंचगंगा रोडवरुन परत जाण्यासाठी मुभा दयावी.आणि पोलीस प्रशासनाने सर्वाना समान न्याय या हेतूने कोणताही दबाव न घेता नियमावलीचे कठोर पालन करावे जेणेकरुन सर्वानाच उत्सवाचा आनंद घेता येईल .
सोबतचे निवेदन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख तानाजी सावंत यांनी स्वीकारले व शिष्टमंडळाबरोबर सविस्तर चर्चा करून आपण सुचवलेले मार्ग सूचना योग्य आहेत याबाबत शहरपोलीस उपाधीक्षक चारही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याबरोबर चर्चा करूनहे पर्यायी मार्ग कसे उपलब्ध करता येतील याचा प्राधान्याने विचार करूनजेणेकरून सर्व प्रेक्षक नागरिकांना आनंद घेता येईल आणि पारंपारिक देखावे पारंपारिक वाद्यांचे मंडळांना सादरीकरण करता येईल अशा पद्धतीने निश्चित विचार केला जाईल असे सांगितले
त्याचबरोबर शिष्टमंडळातील कार्यकर्ते रमेश मोरे सुशील भांदीगरे .गजानन यादव .अशोक पोवार रणजीत शिंदे यांनी आम्ही सुचवलेल्या सूचना व मार्गाचे जाहीर प्रसिद्धीकरण करून याबाबत सुद्धा नागरिक व गणेश मंडळांच्या हरकती सूचना घेऊन सर्वांना सोबत घेऊनच यावर त्वरित निर्णय घ्यावा असे सांगितले .या शिष्टमंडळात अशोक पोवार ,रमेश मोरे ,गजानन यादव, सुशील भांदीगरे, प्रकाश आम,टे विनोद डूणूंग, राजाभाऊ मालेकर, बाबा वाघापूरकर ,मिलिंद हिरलोस्कर ,इंद्रजीत पवार ,रणजीत शिंदे, संतोष दिंडे ,सुनील जाधव, रमेश पुरेकर, सदानंद सुर्वे, रामभाऊ कोळेकर, राजाराम कांबळे ,विजय जाधव,सागर भांडवले आदी,विविध मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..

🤙 8080365706