आगामी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, विधानसभा निवडूणुक या अनुषंगाने करवीर पोलीस ठाणे हद्दीत शांतात बैठक

कोल्हापूर : करवीर पोलीस ठाणे हद्दीत गोकुळ अष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने पाचगाव, मोरेवाडी, जरगनगर, रामानंदनगर उपनगरीय भागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, गणेशउत्सव साजरे करणारे तालीम ,मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांची शांतता बैठक घेण्यात आली.

 

 

सदर बैठकीत सर्व गणेश मंडळांनी सामाजिक विधायक उपक्रमा बरोबरच कोणत्याही प्रकारे रहदारीस अडथळा अथवा अबाल वृद्ध, लहान मुले, स्त्रिया नागरिकांना अनाहूत त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन मिरवणूक व इतर कार्यक्रम साजरे करावेत. जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमण्यात यावे. आक्षेपार्ह, पोस्टर बॅनर, मेसेजेस, स्टेटस रिल्स,गाणी, देखावे, लावले जाणार नाहीत. अथवा ते फॉरवर्ड केले जाणार नाहीत. कोणत्याही अफवांना बळी न पडता पोलीस स्टेशन अथवा 112 वर तात्काळ संपर्क साधावा.वगैरेबाबत सविस्तर मुद्देनिहाय सूचना देऊन सण उत्सवा बरोबर आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच दिनांक 09 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली, वेळी घ्यावयाच्या दक्षतेबाबतही तरुणांना अवगत करण्यात आले.
यावेळी बीट अंमलदार दत्ता बांगर,बालाजी हांगे, गोपनीय अविनाश पोवार उपस्थित होते