शक्ती पीठ महामार्गातील सरकारचा लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण? आमदार सतेज पाटील यांचा राज्य सरकारला सवाल…
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महा धरणे आंदोलन करण्यात येणार; आमदार सतेज पाटील यांची माहिती….
एकीकडे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं राज्य सरकार सांगत आहे.. तर दुसरीकडं पर्यावरण विभागाकडे या महामार्गाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळ राज्य सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शक्तिपीठ विरोधात आता रस्त्यावरील लढा आणखी तीव्र करण्याबरोबरच १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शक्ती पीठ महामार्गाला विरोध दर्शवण्याकरिता शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. एकीकडे शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याच सरकार तोंडी सांगत आहे. तर दुसरीकडे या महामार्गासाठी पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळ राज्य सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम करत असल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला. शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचं खोट सांगून, राज्य सरकारन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळं आता, रस्त्यावरील आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी 12 ऑगस्टला महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहितीही आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्वच शेतकऱ्यांनी, शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याच आवाहनही त्यांनी यावेळी केल. शिवाय नको असलेला महामार्ग जनतेवर लादला जात असल्याने, या महामार्गातील सरकारचा लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे. असा सवालही त्यांनी उपस्थित करत, राज्य सरकारवर टिका केली..
दरम्यान, ऐका बाजूला आम्ही शक्तिपीठ महामार्ग लोकांना सोबत घेऊन करणार असल्याच राज्य सरकार सांगत आहे.. मग मागच्या दाराने पर्यावरण कडे प्रस्ताव कसा दिला. पावसाळी आधिवेशन दरम्यान १५ दिवसात लोकप्रतिनिधी ची बैठक घेणार असल्याचं सरकारने सांगितलं होत.
मात्र ती बैठक देखील झाली नाही. 12 तारखेला होणाऱ्या महाधरणे आंदोलनानंतर लवकरच या संदर्भात कोल्हापूर मध्ये आम्हीं राज्यव्यापी परिषद घेणारं असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात आक्रमक भूमिका मांडत, हा महामार्ग रद्द करण्याची मागणी सभागृहात केली होती. आमदार सतेज पाटील यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम या पावसाळी अधिवेशना दरम्यान केले आहे. याबद्दल आमदार सतेज पाटील यांच्या अभिनंदनचा ठराव देखील आज झालेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती यावेळी गिरीश फोंडे यांनी दिली.पत्रकार परिषदेला गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, सम्राट मोरे, के बी पाटील, शिवाजी कांबळे, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.