मुंबई :भारताच्या विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कमाल केलीय. विनेशने फायनलमध्ये प्रवेश केलाय. महिला कुस्तीच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. 50 किलो वजनी गटात सेमीफायनलमध्ये तिने प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी विजय मिळवला.
लैगिक शोषणाविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचे नैतृत्व विनेश फोकाट ने केलं होत कुस्तीबरोबरच या आंदोलनामुळे विनेश चे नाव चर्चेत होते,तिनं व काही महिला पैलवानांनी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला , त्यावर योग्य अशी कारवाई न झाल्यामुळे विनेश ने तिला मिळालेला अर्जुन पुरस्कार हि परत केला होता.