गांधीनगर ग्रामपंचायत सरपंच आणि एका सदस्याने सतेज पाटील गटात प्रवेश केला,या विरोधात भाजप आणि सिंधी समाजाच्या सर्व सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली, या परिषदेमध्ये गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य रवी मल्लाने म्हणाले की की,ही प्रवेश प्रक्रिया एका दिवसात घडलेली नाही सरपंच झाल्यापासून संदीप पाटोळें याने भ्रष्टाचार आणि गैर कृत्याच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी गैरमार्गाचा वापर केला. तसेच उपसरपंचाच्या निवडणुकीत नेत्यांचा आदेश डावलुन सतेज पाटील गटाला मदत केली. गांधीनगरला महसुली गावाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि ग्रामपंचायतीचे डीएससी ऍक्टिव्ह करण्यासाठी धनंजय महाडिक ,अमल महाडिक, शौमिका महाडिक वर्षभर प्रयत्न करत आहेत. हे काम होणार या संधीचा फायदा घेऊन संदीप पाटोळे यांनी सतेज पाटील गटात प्रवेश केला,व हे काम सतेज पाटील यांनी केल म्हणून विरोधी गटात गेलो असे सांगुन लोकांची दिशाभुल केली. खरं पाहायला गेले तर फक्त आणि फक्त स्वतःच्या भ्रष्टाचारावर पांघरून टाकण्यासाठी आणि स्वार्थासाठी त्यांनी विरोधी गटात प्रवेश केलेला आहे, त्यांना सरपंच करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि सिंधी समाजाने मेहनत घेतली या सर्वांचा विश्वासघात केलेला आहे . या परिषदेमध्ये रितू हरीश लालवानी ,रीना अवघडे ,सरिता कटेजा ,रवी मल्लाने आदी उपस्थित होते.