अहिल्यादेवी होळकरांचे विचार व कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी : राजे समरजितसिंह घाटगे

कागल , प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार व कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. करनुर (ता. कागल) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री घाटगे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर,छत्रपती शिवाजी महाराज व मल्हारराव होळकर महाराज यांच्या पुतळ्याचे व ज्योत पूजन करून अभिवादन केले. बिरदेव तरुण मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

घाटगे पुढे म्हणाले, अहिल्यादेवींनी दोनशे वर्षांपूर्वी क्रांतिकारक निर्णय घेतले. अनेक जुन्या चालीरीती रूढी परंपरा बंद केल्या. त्यांचे विचार व कार्य केवळ धनगर समाजालाच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाला पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारे आहे.छत्रपती शाहू महाराज व होळकर या दोन घराण्यांचे ऋणानुबंध होते. त्यातूनच धनगर समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे.

यावेळी बिरसिद्ध धनगर,उपसरपंच तानाजी भोसले, लक्ष्मण धनगर,कृष्णा धनगर, आनंदा धनगर, आनंदा पाटील, ए जे कदम, तानाजी शिंदे, सुखदेव कांबळे, जयसिंग घाटगे, कुमार पाटील, सचिन घोरपडे,जयेंद्र चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी स्वागत सतीश धनगर यांनी केले तर आभार तानाजी धनगर यांनी मानले.